Ads

सिंदेवाहीत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही: शहरातील स्मशानभूमीत मधमाशांचा हल्ला झालाची घटना घडली, मृतदेह सरनावर ठेवत असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याने अंत्ययात्रेतील 22 नागरिक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.Bees attack citizens who went for funeral in Sindewahi cemetery
चंद्रपूर जिल्ह्यात मधमाशांनी हल्ला केल्याची दुसरी घटना आहे. शहरातील महाकाली नगरी परिसरात राहणारे राजू मार्तंडवार यांचे निधन झाले. यांची प्रेतयात्रा दुपारी वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करिता नेण्यात आली. स्मशानभूमीतील सरण रचले गेले व विधी सुरु झाली होती त्यानंतर मृतकाच्या प्रेताला अनी द्यायची बाकी असताना दुपारी 1 वाजता दरम्यान मधमाशांनी हल्ला केला.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नातेवाईक व नागरिकांनी, महिला, पुरुष लहान मुले हल्ला झाल्याने वाटेल तसे पळ काढला होता काही नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने जखमी झाले मधमाशांचे काटे अंगाला, मांडीला, हाताला, मानेला चावा घेऊन रुतलेले होते. मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतलेला होता. मृतकाचे सरनावरचे रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते. सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला व वाहने सोडून लांबवर उभे राहून लक्ष देत राहिले.
स्मशानभूमीच्या परिसरात मधमाशांचा वावर सुरूच होता. ग्रामीण रुग्णालयात 40 जखमींना उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. मधमाशांनी हल्ला केल्याने काटे रुतलेले होते ते काढण्यात आले. मधमाशांनी चंदू श्रीकुंडवार व प्रदीप अटकापूरवार गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार दुपारी 4 वाजता नंतर करण्यात आले.

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 40 नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरू असून ते बरे आहेत
- *डॉ. झाडे ( MS )ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही*
*यांची माहिती*
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment