Ads

अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर वनविभागाची कार्यवाही.

राजुरा :परिक्षेत्र राजूरा नियतक्षेत्र खांबाळा कक्ष क्रमांक 178 मध्ये गस्त करतांना दोन ईसम अवैधरित्या वृक्षतोड करून मोटार सायकलद्वारे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येताच त्यांना मोटार सायकलसह ताब्यात घेऊन सदर आरोपींविरुद्ध POR क्र. 8891/222261 दि.15/5/2023 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी सुनील भाऊराव हजारे (41), प्रभाकर बारीकराव टेकाम (67) दोन्ही आरोपी राहणार खांबाडा यांना वनकोठडी देण्यात आली.
Forest department action against illegal tree fellers.
सदर कार्यवाही मध्य चांदा वनविभागच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनअधिकारी श्रीकांत पवार, एस.डी.येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजूरा यांच्या नेतृत्वात आरोपीच्या घराची वन कर्मचाऱ्यांचे सहकाऱ्याने झडती घेतली असता त्यांचे घरामधून अवैधरित्या साठवून ठेवलेला सिसम प्रजातीचे वनोपज व ईतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी एस.एम.संगमवार, क्षेत्र सहाय्यक, टेंबूरवाही, प्रकाश मत्ते, क्षेत्र सहाय्यक, राजुरा, डी. एम. चंदेल, वनरक्षक नियत क्षेत्र , खांबाडा, एन. ए. पोले, वर्षा वाघ, मीरा राठोड, एस.डी. सुरवसे , सायस हाके व नियत वन रक्षक व वनमजुर उपस्थित होते. पुढील तपास वनविभाग राजुरा कडून सुरु असून या कार्यवाहीने अवैधरित्या वृक्षतोड करून तस्करी करणारे चांगलेच धास्तावले आहे. राजुरा वनविभाग येथे वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून सुरेश येलकेवाड रुजू झाल्यापासून अवैध शिकारी आणी वृक्षतोड करणाऱ्यावर धडक कार्यवाही करीत आहे. जंगलबहुल परिसराचा सूक्ष्म अभ्यास करून व जंगला लगतच्या भागातील गावकरी यांना विश्वासात घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वन्यप्राण्यांची अवैध शिकारी आणी वृक्षतोडीवर कार्यवाही केली जात आहे. मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्या संदर्भातही अनेक उपाययोजना राबाविण्यात येलकेवाड यशस्वी झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment