Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट

चंद्रपुर :आज रवीवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा येथील विश्राम गृह येथे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेत त्यांना आॅक्टोंबर महिण्यात आयोजित माता महाकाली महोत्सवासाठी आमंत्रीत केले आहे. यावेळी सचिन तेंडूलकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती घेतली. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पकंज गुप्ता, प्रा.श्याम हेडाऊ यांचीही उपस्थिती होती.MLA Kishore Jorgewar met Bharat Ratna Sachin Tendulkar
क्रिकेटचा देवता म्हणुन ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडूलकर सध्या ताडोबा सफारी करीता चंद्रपूरात आले आहे. दरम्यान आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा येथील विश्रामगृह येथे सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. यावेळी माता महाकालीची मुर्ती देत आमदार किशोर जोरगेवार यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही आॅक्टोंबर महिण्यात आयोजित श्री. माता महाकाली महोत्सवात येण्याचे आमंत्रनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सचिन तेंडुलकर यांना दिले आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. यात अम्मा का टिफिन या उपक्रमाचाही समावेश असुन या उपक्रमाअंतर्गत गरजुंना घरपोहच जेवनाचा टिफिन पोहोचविले जात आहे. आज भेटी दरम्यान अम्मा का टिफिन या उपक्रमा बाबतही सचिन यांनी माहिती जाणून घेत उपक्रमाचे कौतुक केले आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरात आयोजित करण्यात आलेल्या माता महाकाली क्रिडा महोत्सवा बाबतही यावेळी सचिन तेंडुलकर यांना माहिती देण्यात आली. सदर महोत्सवा अंतर्गत मतदार संघातील विविध 10 ठिकाणी 21 प्रकारच्या जिल्हा, विदर्भ आणि राज्यस्तरिय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवामध्ये जवळपास पाच हजार खेळाडुंनी सहभाग घेतला होता. यातील तिन हजार खेळाडू हे मुक्कामी होते. या आयोजनाचेही यावेळी सचिन तेंडूलकर यांनी कौतुक केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment