Ads

भद्रावती येथील मांगली गावातील मंदीरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींचा शोध लावण्यात पोलीसांना यश

भद्रावती तालुका प्रतिनिधी :
दिनांक २३/०३/२०२३ रोजी फिर्यादी नामे मंगेश बाबुराव खारकर वय ४२ वर्ष, रा. मांगली यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक २२/०३/२०२३ ते २३/०३/२०२३ रोजीचे रात्रौ दरम्यान त्यांचे शेतातील जगन्नाथ बाबा मंदीरात त्याचे वडील (मृतक) नामे बाबुराव संभाजी खारकर वय ८० वर्ष व शेजारील शेतकरी (मृतक) नामे मधुकर लटारी खुजे वय ६५ वर्ष दोन्ही रा. मांगली हे मंदीराचे देखरेखीकरीता झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरांनी मंदीरात चोरी करण्याच्या उद्देशाने हत्यारासह प्रवेश करुन नमुद मृतक हयांना हत्याराने त्यांचे डोक्यावर वार करुन जिवानिशी ठार माले व मंदीरातील दानपेटीचे कुलूप तोडुन दानपेटीतील नगदी रक्कम अंदाजे २०००/- चोरुननेले व दानपेटी काही अंतरावर फेकुन दिली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे भद्रावती येथे अपराध क्रमांक १४० / २०२३ कलम ३०२, ४५८, ४६०, ३८० भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला.Police succeeded in tracing the accused in the double murder case in Mangli village of Bhadravati
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशान्वये श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे कडे देण्यात आला. मौजा मांगली येथील मंदीरामध्ये झालेल्या कुर दुहेरी हत्याकांडामुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण होवु नये म्हणुन सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी ८ विशेष तपास पथके तयार करुन सर्व दृष्टीकोणातुन तपास सुरु केला. त्याप्रमाणे स्थानिग गुन्हे शाखेचे पोनि श्री महे कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे विशेष पथके हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणेकामी घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरात खाना केले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करुन एका आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदारासह मौजा मांगली येथील जगन्नाथ बाबा मंदीरात दानपेटी मधील पैसे चोरी करण्यासाठी गेले असता, मंदीराचे दार उघडत असतांना दाराच्या आवाजाने मंदीरात झालेले मृतक इसम हे जागे झाल्याने त्यांना चोरी करण्यास अडथळा निर्माण होवु नये व त्याचे बिंग फुटू नये या उद्देशाने त्यांनी अत्यंत कुरतेने त्यांच्या हातात असलेल्या हत्याराने वर नमुद मृतकांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर कुरपणे वार करुन जागीच जिवानिशी ठार मारले व मंदीरातील दानपेटी घेवुन पसार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आले. नमुद आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांचे न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला असुन गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

अशा प्रकारे अत्यंत संवेदनशिल व गुंतागुतींच्या व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्हयाचा बुध्दीचार्तुयाने कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंध अपर पोलीस अधीक्षक चंदूपर, श्री आयुष नोपानी, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, श्री सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, पोनि श्री विपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सपोनि श्री जितेंद्र बोबडे, श्री सुधीर वर्मा, श्री अजित देवरे, श्री विशाल मुळे, पोउपनि श्री विनोद भुरले, श्री अतुल कावळे, श्री अमोल कोल्हे, श्री अमोल तुळजेवार तसेच पोहवा संजय अतुकलवार, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठठेवार, विजय नागपूरकर, अली मुजावर, अर्जुन मडावी, नापोशि संतोष येलपुलवार, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, पोशि गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, नरेश डाहुले, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, अमोल सावे, वैभव पत्तीवार, दिनेश अराडे यांनी केली असुन पुढील तपास श्री आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment