भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :तालुक्यातील रानतळोधी या गावाला वनग्रामाचा दर्जा असल्यामुळे येथील गावकऱ्यांना आवश्यक असलेले विविध दाखले काढण्यासाठी महसुली पुरावे उपलब्ध नव्हते. मात्र राजस्व विभागाच्या शासन आपले दारी या योजनेअंतर्गत गावात शिबिर घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते भद्रावती तहसील कार्यालयातर्फे गावकऱ्यांना विविध आवश्यक कागदपत्रे वितरित करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्याआहेत. Distribution of necessary documents and certificates by MLA Pratibha Dhanorkar to the villagers of Rantalodhi.
सदर कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जांन्सन, तहसीलदार अनिकेत सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी डॉक्टर मंगेश आरेवार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, सुधीर मुडेवार, काजल मडावी, केशव नवघरे, तलाठी खुशाल मस्केष ग्रामसेवक विजय पाझारे आदी मान्यवर उपस्थित होते. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखले व प्रमाणपत्रांची गरज असते. मात्र, रानतळोधी गाव हे व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये येत असून त्याला वनग्रामाचा दर्जा असल्यामुळे येथील गावकऱ्यांजवळ आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे येथील गावकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होते. गावातील विद्यार्थ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना् यामुळे अडचण निर्माण होत होती. मात्र शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत येथील गावकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी आता दूर झाल्या आहेत.
0 comments:
Post a Comment