Ads

भद्रावती शहरात चोरी, अज्ञात चोरट्याने 38 ग्रॅम सोन्यासह रोख रक्कम पळविली

भद्रावती जावेद शेख :भद्रावती शहरातील जवळे प्लॉट येथील एका घरात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी 38 ग्रैम सोन्याच्या दागिन्यांसह 3500 रोख रक्कम लांबविल्याची घटना दिनांक 28 रोज बुधवार ला मध्यरात्री जवळे प्लाट येथे घडली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहेTheft in Bhadravati town,
unknown thief stolen 38 grams of gold and cash
. बंडू कडूकर हे जवळ प्लॉट येथील आपले सासरे बडवाईक यांच्या घरी वरच्या माळ्यावर राहतात. सासरे एकटेच असल्यामुळे त्यांचे कुटुंब हे खालच्या माळ्यावर रोज सासऱ्याकडे झोपायला येतात. घटनेच्या दिवशी रात्रोला जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंब हे नेहमीप्रमाणे खाली सासऱ्याकडे झोपण्यासाठी आले होते. सकाळी वरच्या माळ्यावरील आपल्या घरी गेले असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरात तपासून बघितले असता त्यांच्या घरातील तीन तोळ्यांची पदक असलेली सोन्याची पोत, प्रत्येकी चार ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व 3500 रोख रक्कम नाहीशी झाल्याचे दिसून आले.सदर घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. शहरात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिकांमधे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment