चंद्रपुर तालुका प्रतिनिधी:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येत्या ५ जुलै रोजी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचा शिलान्सास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमांसाठी स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल अविकसित नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार असल्याने आणि ही इतिहासातील पहिलीच घटना असून आजपर्यंत एकाही राष्ट्रपतीने या जिल्ह्याला कधीही भेट दिलेली नाही यासाठी या जिल्ह्याला ७६ वर्षापर्यंत वाट पहावी लागली. ही या जिल्ह्यासाठी खास भेट असणार आहे.
Child illustrator Pranjali Tiranik's picture of President Draupadi Murmu coming to tribal district for the first time
आणि हा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला जावा म्हणून आदिवासी समाजातील बालचित्रकर्ती प्रांजली परमानंद तिराणिक हीने आपल्या कलेच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या भेटीचे औचित्य साधून त्यांच्या स्वागताकरिता भारताच्या दुसऱ्या महिलामधून आदिवासी समाजाच्या पहिल्या लाडक्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे रेखाचित्र रेखाटून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची ओळख ही कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहावी यासाठीच प्रांजली परमानंद तिराणिक या बालचित्रकर्तीने चित्र साकारले आहे.
0 comments:
Post a Comment