Ads

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेते- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेते- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक वैश्विक नेते आहेत. गेल्या नऊ वर्षात त्यांनी भारताला अतिउच्च शिखरावर नेऊन पोचवले. गरीब हाच केंद्रबिंदू मानला .कोरोना काळात कोविडच्या लसीकरणाद्वारे गरजूंना जगण्याकरता मदत केली. त्याच मोदींच्या भारतीय जनता पक्षात आज जनमानसातले तडफदार नेते इंजि. रमेश राजुरकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. अर्ध्या रात्रीही जनमानसांचे प्रश्न घेऊन आलात तरी आमचे दार खुले आहे असे म्हणत जनमानसांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भद्रावती येथील एका कार्यक्रमात दिले.Prime Minister Narendra Modi is a global leader - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
लाभार्थी संमेलन व इंजि. रमेश राजुरकर यांचाप्रक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी 75 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे स्थानिक जैन मंदिर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
सदर कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , सांस्कृतिक, वने व मत्स्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोग भारत सरकार राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर ,आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार , आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार आशिष देशमुख,ज्येष्ठ भाजपा नेते बळवंतदादा गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, नरेंद्र जिवतोडे,करण देवतले, अहेते शाम अली वरोरा , किशोर गोवारदीपें, अमित गुंडावार, इम्रान खान, विजय वानखेडे, प्रवीण ठेंगणे, तुडशीराम श्रीरामे,विजय राऊत ,बाबा भागडे, चंद्रपूर जिल्हा तथा भद्रावती- वरोरा तालुका व शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांनी भ्रमणध्वनीच्या द्वारे पंतप्रधान मोदींना संदेश पाठविण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

काँग्रेस, शिवसेना, मनसे व अन्य पक्षातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपावर व भाजपच्या नेतृत्वावर विश्वास अधोरेखित केला .प्रवेश करणाऱ्यांचे पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो तसेच रमेश राजूरकर यांचे मी विशेष स्वागत करतो असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या भाषणातून म्हणाले.
प्रास्ताविक रमेश राजूरकर यांनी केले. त्यामधून त्यांनी भाजपमध्ये येण्याची कारणे सांगत प्रत्येक परीक्षेत संपूर्ण मार्कांसह चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे भव्य स्वागत करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमा प्रसंगी भद्रावती भाजपा तालुका तथा शहर प्रमुख, भारतीय जनता युवा मोर्चा शहर व ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ,भाजप महिला पदाधिकारी ,शहरी व ग्रामीण महिला आघाडी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा . प्रशांत खुळे व माधव बांगडे यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment