तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती :-महसूल विभागाकडून तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या रेतीचे वाटप महसूल विभागाकडून शहरातील नऊ घरकुल लाभार्थ्यांना करण्यात आले आहे.Distribution of sand to Gharkul beneficiaries in the city.
उर्वरित लाभार्थ्यांना सोमवारला रेतीचे वाटप करण्यात येईल.शहरातील घरकुल लाभाभार्थ्यांना घर बांधणीसाठी रेती मिळावी यासाठी भद्रावती नगरपरिषद प्रशासनाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना एका अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती. यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे 10 घरकुल लाभार्थ्यांची यादी महसूल विभागाकडे देण्यात आली होती. या अर्जाची दखल घेत ही यादी उपविभागीय अधिकाऱ्याकडून मंजूर करण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालय परिसरात साठवून ठेवण्यात आलेली सदर रेती प्रति लाभार्थीना पाच ब्रास याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. ही रेती मिळाल्याने शहरातील संबंधित घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.नगरपरिषद तथा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर रेतीचे घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. ही रेती तहसील कार्यालयातून घरापर्यंत नेण्यासाठी येणारा खर्च हा संबंधित लाभार्थ्यांना करावा लागणार आहे.
0 comments:
Post a Comment