Ads

सततच्या नापिकेने कंटाळून पस्तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या.

भद्रावती तालूका प्रतिनिधी जावेद शेख :-गेल्या तीन-चार वर्षांपासून ची सततची नापिकी व यावर्षी मुसळधार पावसाने वाहून गेलेले पीक व कर्जाचा डोक्यावरचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या एका 35 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिचोली या गावात घडली.A 35-year-old farmer commits suicide due to constant barrenness.
विवेक ताराचंद गेडाम वय 35 वर्ष राहणार चिचोली हे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आई असा आप्तपरीवार आहे. सदर मृत शेतकरी हा गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच्या सततच्या नापिकेने त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. यावर्षी सुद्धा त्याने आपल्या अल्पशेतीत खरिपाचे पीक लावले होते. मात्र या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे नैराश्य येऊन सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली. पत्नी शेतात व मुले शाळेत गेले असताना आपल्या राहत्या घरीच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मुली शाळेतून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल तुलजेवार करीत आहे तरुण शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment