Ads

मल्हारी बाबा सोसायटी येथील विद्युत डी.पी स्थानांतर करा - आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष आशिषभाऊ तांडेकर यांची मागणी

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :दिनांक 22 जुलै 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भद्रावती येथे निवेदन देण्यात आले, मल्हारी बाबा सोसायटी येथील स्थानिक लोकांची तक्रार आम आदमी पार्टीला प्राप्त झाली.Shift Electricity DP at Malhari Baba Society - Demand of Aam Aadmi Party City Vice President Ashishbhau Tandekar*
तक्रार अशी आहे की मल्हारी बाबा सोसायटी येथे खापरी वार्ड मध्ये जाण्याच्या मार्गाला पुलियाजवळ विद्युत डी.पी आहे. सलग तीन दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे वार्डात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक घरांमध्ये पाणी घुसलेला आहे आणि विद्युत डी.पी सुद्धा पाण्याच्या विळख्यात आलेली आहे. कोणतीही अनुचित घटना टाळता येत नाही. त्या विद्युत डी.पी मुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे व ते विद्युत डी.पी आज लोकांसाठी धोकादायक ठरत आहे. यावर तत्काल दखल घेत आम आदमी पार्टी भद्रावतीच शिष्टमंडळ व मल्हारी बाबा सोसायटी इथल्या नागरिकांना घेऊन मुख्य अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना भेट दिली व सांगितले की त्या विद्युत डी.पी ला स्थानांतर करण्यात यावे, अन्यथा काहीही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कोणतीही मानव हानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भद्रावती यांची राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आम आदमी पार्टी भद्रावती शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय भाऊ सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे, जी.बि हस्ते, पुष्पा हस्ते, जितेंद्र प्रसाद, संजूदेवी प्रसाद, प्रवीण ठोंबरे, निशा ठोंबरे, मुर्गेसन शेट्टी, पि.काकडे, सुरेश मोहनकर, कमलेश मोहमारे, राजेश यादव व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment