भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :सांसद आदर्श ग्राम असलेल्या चंदनखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांनी कर्मचार्यांसोबत दारू पार्टी केली. या निंदनीय प्रकाराचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून या घटनेमुळे गावाचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे कार्यालयात दारू पार्टी करणाऱ्या ग्रामसेवक तथा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व या सर्वांना निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गावातील तंटामुक्ती समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
Take action against the officers and employees of Chandankheda Gram Panchayat Office who throw alcohol party.
दिनांक 25 ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ग्रामसेवक तथा कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयातच दारू पार्टी रंगली होती. त्याच सुमारात गावातील काही युवक क्रिकेट खेळत असताना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांना हा प्रकार आढळून आला. यातील काही तरुणांनी याचा व्हिडिओ तयार केला. या तरुणांनी याबाबत त्यांना विचारणा केली असता सर्वजण तेथून पसार झाले. नंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यातील सर्व आरोपीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी चंदनखेडा येथील तंटामुक्त समितीतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.

0 comments:
Post a Comment