जावेद शेख तालुका प्रतिनिधी:
भद्रावतीचे ठाणेदार बिपीन इंगळे यांनी शहरातील अवैध धंद्यांना चांगलाच वचक बसविलेला असुन एका महिण्यात शहरातील विस अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.Police Station Incharge Bipin Ingle of Bhadravati took action against twenty illegal businesses in one month.
विवीध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत केवळ एका महिण्यात दारुविक्रेत्यिंकडून चार लाख सत्तर हजार रुये जुगार,सट्टापट्टी व्यवसायीकांकडून सत्ताविस हजार सहाशे तिस रुपये सुगंधीत तंबाखुचा व्यापार करणाऱ्यांकडून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन वेगवेगळ्या घटनेत व पाच महिला एकुण सव्वीस आरोपिंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन या कारवाईत शशांक बदामवार यांचे सहकार्य लाभले.यापुढेही शहरातील सर्वच अवैध धंद्यावर वचक कायम राहिल असे ठाणेदार बिपीन इंगळे यांनी सांगितले आहे.
0 comments:
Post a Comment