Ads

चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा २०२३ मध्ये केशवी येरगुडे अव्वल स्थानी.

चंद्रपुर :स्व. अनिल त्रिवेदी स्मृती जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा २०२३ च्या मार्फत दिनांक २७.०७,२०२३ ते ३०.०७.२०२३ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात ९ वर्षे वयोगटातील मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत केशवी अमित येरगुडे सहभागी होऊन सर्व मुलींमधून "प्रथम क्रमांकाची विजेता स्पर्धक" ठरली.Kesavi Yergude tops in Chandrapur District Badminton Tournament 2023.
दिनांक ३०.०७.२०२३ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता चंद्रपूर जिल्हा स्टेडियम क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी श्री विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर श्री के. रामकृष्ण, कार्यकारी संचालक, SAIL (MEL) चंद्रपूर, श्री सुरेश अग्रवाल, संचालक, विजय विंग्स होंडा, चंद्रपूर, श्री गिरीश चांडक, प्रेसिडेंट, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन चंद्रपूर आणि श्री जॉवेल चांदेकर, सचिव चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन चंद्रपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुलींमधून प्रथम विजेता ठरल्याबद्दल केशवी येरगुडे हिला श्री विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह बहाल करून तिचा गौरव करण्यात आला.

अंकुश मोरे सर आणि मलिका निंबाळकर मॅडम यांच्या कुशल मार्गदर्षनाखाली घवघवीत यश संपादन केले त्यामूळे केशवी हिने आपल्या यशाचे श्रेय मोरे सर, निंबाळकर मॅडम आणि आपल्या आई वडिलांना दिले आहे.

केशव रगुडे चे वडिल श्री अमित विठ्ठलराव येरगुडे हे चंद्रपूर येथील स्व. एम. डी. येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर या अग्रगण्य संस्थेचे कर्तुत्ववान सचिव म्हणून कार्यरत आहेत तर आई, डॉ. तृप्ती अमित येरगुडे ह्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. केशवी हीला शालेय शिक्षणासोबत क्रीडा विषयी विशेष आवड असून ती अतिशय हुशार व बुध्दीमान मुलगी आहे. लहापणापासूनच शिक्षणाचे बाळकडू आणि उत्तम संस्कार तिच्या परिवार कडून मिळत आहेत, हे विशेष.

बॅडमिंटन स्पर्धेत केशवी अव्वल स्थानी आल्यामुळे आई वडिल, शाळेतील शिक्षक वृंद आणि नातेवाईक यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment