बल्लारपुर:-शनीवार रोजी विद्याश्री कॉन्वेंटमध्ये विद्यार्थी प्रतिनिधिचे शपथविधी समारोह जेष्ठ नेता व माजी अध्यक्ष वन विकास महामंडल चंदन सिंह चंदेल, शाळेच्या संस्थापक कैलाश खंडेलवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली आर्य ,दिलीप शाह,रूमाना शेख,संजय गुप्ता,अश्विन खंडेलवाल,वसंत खेडेकर ,ज्ञानेंद्र आर्य यांच्या उपस्थितित ओम शिमपुलकर, शाबिर शेख, दिशा निषाद, अनुष्का बहुरिया यांचा शपथग्रहण विधिपूर्वक पार पडला.Meritorious students felicitated by Vidyashree Convent
तसेच वर्ष 2022-23 चे दहाही वर्गाचे गुणवंत विद्यार्थी प्रथम इस्टर नवरे, द्वितीय रुकैया शेख, तृतीय प्रियल शेन्डे यांचा सत्कार चंदन सिंह चंदेल,कैलाश खंडेलवाल अश्विन खंडेलवाल यांच्याहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका समीक्षा व तनुश्री यांनी केले तर शाळेच्या प्रशासक सौ.शोमा लाकडे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी विद्याश्री कॉन्वेंटचे श्यामला नक्का, रीता यादव,तृप्ति बागडे,विद्या ढेंगड़े, पूनम कैथवास,स्नेहा कैथवास, नेहा पाल, आँचल मुट्यलवार, पूनम नातर,चांदनी ,सरिता निषाद, सुनीता रोहिदास, सुप्रिया कश्यप, भाग्यश्री मेश्राम सह विद्यार्थि , कर्मचारीवृंद व पालकगन उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment