भद्रावती,(तालुका प्रतिनिधी) जावेद शेख :-आपल्या शेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला ठार झाल्याची घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी दिक्षीत शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
लक्ष्मीबाई रामराव कन्नाके वय 60 वर्ष राहणार टेकाडी दिक्षीत असे मृत महिलेचे नाव आहे.ती आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच मरण पावली. आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने लक्ष्मीबाईला जागीच सोडून जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून ठाणेदार बिपिन इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल किटे तपास करीत असून वनविभागातर्फे आवश्यक ती कारवाई करण्यात आली.
0 comments:
Post a Comment