Ads

रामपूर येथिल संदीप निमकरच्या तीन मारेकऱ्यांना 2 तासात अटक

राजुरा : रामपूर येथील संदीप देवराव निमकर यांची (दि. ९) यांची हत्या करून आरोपी फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच काही तासामध्ये पोलिस तपास यंत्रणेने शोध घेत तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.Three killers of Sandeep Nimkar from Rampur arrested
शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत वॉर्ड क्रमांक दोन साई मंदिर जवळ राहत असलेला संदीप देवराव निमकर (वय २८) या युवकाची रामपुर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना रोज मंगळवारला चार वाजता उघडकीस आली.

संदीप निमकर हा आपल्या आई वडिलाना एकुलता एक मुलगा होता. (दि. ९) रोज सोमवारला रात्री आठ वाजता घरून निघून गेला तेव्हापासून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता रामपुर लगत जंगलात झुडपामध्ये संदीप यांचा मृतदेह दिसून आला. ही माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे व राजुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हत्याऱ्याचा तपास सुरू केला.

मंगळावरला रात्री संदीप निमकर यांचा मारेकरी वीरेंद्र बोंतला (वय २१) मू. रामपुर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केली असता संदीप आणि विरेंद्र एकाच वार्डमध्ये राहत असून घटनेच्या दिवशी तिघेही दारू पिण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले त्याठिकाणी नशेत असताना संदीप व विरेंद्र यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता राग अनावर न झाल्याने काठी व दगडाने संदीपची खून केल्याची कबुली दिली. यात त्यांच्या साथीला त्यांचे बंधू विष्णू बोंथला (वय २२) व संकेत उपरे (वय २५) राजुरा यांनी संदीपची हत्या करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांना सांगितले यांच्यावर भांडवी कलम ३०२, ४३, २०१ लावली असून समोरील तपास राजुराचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment