Ads

आप दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेचा विश्वास संपादित करेल- धनंजय शिंदे

तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद
शेख :दिल्ली आणि पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक सुविधा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही पक्ष येतील नागरिकांचा विश्वास संपादित करेल असे प्रतिपादन राज्यातील आपचे वरिष्ठ नेते धनंजय शिंदे यांनी केले. AAP will earn the trust of the people in Maharashtra as in Delhi - Dhananjay Shinde.
आज भद्रावतीत पक्षाची झाडू यात्रा शहरात पोहोचल्या नंतर या यात्रेचे शहर व तालुका आम आदमी पक्षातर्फे भव्य स्वागत करण्यात आले .त्यावेळी ते बोलत होते .यावेळी त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झालेले पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. भद्रावती आपचे सुरज शहा यांनी या झाडू यात्रेचे स्वागत केले.
वर्धा जिल्ह्यातील गांधी आश्रम येथून दोन ऑक्टोबरला निघालेल्या आम आदमी पक्षाच्या झाडू यात्रेचे भद्रावती शहर तथा तालुका आम आदमी पक्षातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. आम आदमी पक्षाची ही झाडूयात्रा अकरा ऑक्टोबर पर्यंत चालणार असून राजुरा येथे या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. विदर्भातील जवळपास 70 तालुक्यांमधून ही यात्रा फिरून भद्रावती शहरात यात्रेचे आगमन झाले. विदर्भातील नागरिकांशी संवाद साधून व त्यांच्या समस्या जाणून घेणे हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्याबरोबरच आम आदमी पक्षाचे संघटन संपूर्ण विदर्भात मजबूत करणे व आगामी येणाऱ्या निवडणुकीची पूर्व तयारी करणे हा सुद्धा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एका सभेचे आयोजन करण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या ,महिला सुरक्षिततेच्या समस्या, विज समस्या, आरोग्य समस्या व शैक्षणिक समस्या या विदर्भातील मुख्य समस्या असून आम आदमी पक्ष दिल्ली व पंजाब प्रमाणे येथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विदर्भातील जनतेला एकत्र आणून त्यांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . सदर यात्रा विदर्भातून जवळपास दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यावेळी वरिष्ठ नेत्यांनीशहरातील पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी,भद्रावती आपचे सुरज शहा, सोनल पाटील, सुमित हस्तक तथा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment