(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - आज दिनांक 10/10/ 2023 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजी चौक ते देवयानी शाळा सिंदेवाही याठिकाणी ट्रक चा पाठलाग करून अवैध जनावर वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक AP- 29 U- 9219 अंदाजे किंमत (दहा लाख 10,00,000/- रूपये किमंतीचा ट्रक पकडला असता ट्रक चालक व त्याचा साथीदार पळून गेला त्यानंतर ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये 27 नग गोवंश अत्यंत क्रूरपणे पाय बांधून कत्तलीसाठी कोंबून नेत असल्याचे दिसून आले. caught the truck that was transporting illegal animals after being chased by the Shendiwahi police
टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक AP 29 U 9219 अंदाजे किंमत 10,00,000/- व 27 नग बैल अंदाजे किंमत 2,70,000/- असा एकूण 12,70,000/-( बारा लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा मुदैमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही ठाणेदार तुषार चौहान यांचे मार्गदर्शनात पि.एस.आय. सागर महल्ले,
सहाय्यक फौजदार बावणे, पोलीस हवालदार सोनुले, गेडेकर, मोहित यांनी केलेली आहे.
0 comments:
Post a Comment