Ads

दिपक तुरारे यांची राष्ट्रवादी भद्रावती तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ती

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- मा. ना. धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषधं प्रशासन मंत्री म. रा. यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती व अनेक युवकांचा प्रवेश झाला.
Deepak Turare appointed as NCP Bhadravati Taluka Youth President
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक विस्तार सुरू आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अजित पवार गटाचे काम जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भद्रावती विधानसभा प्रमुख विलास नेरकर यांच्या नेत्रुत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी देण्यासाठी भद्रावती शहर अध्यक्ष म्हणून नुकतीच गितेश सातपुते यांची नियुक्ती झाली असता त्यांनी भद्रावती शहरा मध्ये पक्ष बांधणीसाठी झंझावात सुरु झाला असता दीपक तुरारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे भद्रावती येथील युवकांमध्ये संगठात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केल्या जातं आहे. त्यांच्या सोबत आशिष दैवलकर,बालू जोगी,ओंकार वरखडे, परिक्षत बंग यांनी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते दीपक तुरारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या भद्रावती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, जेष्ठ नेते अबिद अली. राजीव कक्कड चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष,वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख विलास नेरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, राजू बोरकर, चंद्रकांत कुंभारे,रवींद्र भोयर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment