Ads

काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

चंद्रपूर, दि. ०७ डिसेंबर २०२३: Congress leader Mp Sonia Gandhi काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथे शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Distribution of sewing machines and note-books on the occasion of Congress leader Sonia Gandhi's birthday
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बल्लारपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदांनी, ग्रामीण तालुका अध्यक्ष बल्लारपूरचे गोविदा पाटील उपरे यांचेसह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
चोखारे हे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्रचे संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती तथा संचालक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी सभापती, अर्थ व बांधकाम आहेत.
या कार्यक्रमात इटोलीसह बल्लारपूर तालुक्यातील काही गावातील गरीब, बेरोजगार आणि अनाथ महिलांना शिलाई मशीन आणि मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment