Ads

मेट्रोपॉलिस हेल्थकेअरचे पहिले नवीन प्रगत निदान चाचणी केंद्राचे उद्घाटन Inauguration of Metropolis Healthcare's first new advanced diagnostic test center

चंद्रपूर, १६ डिसेंबर २०२३ : भारतातील अग्रगण्य निदान सेवा कंपनी असलेल्या मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे पहिले नवीन मेट्रोपॉलिस लॅब सर्व्हे नंबर १०७ /२०ए तळमजला, सत्या टॉवर्स, एसटी वर्कशॉप जवळ, दुर्गापूर रोड. तुकुम, चंद्रपूर येथे असुन त्याचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती साने यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते. मेट्रोपॉलिस  हेल्थकेअर चे हे नवीन निदान केंद्र १२०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले असून येथे वेगवान कामकाज आणि उच्च दर्जाचे अहवाल यांसह दर महिन्याला सुमारे ६००० नमुने घेण्याची क्षमता आहे.
Inauguration of Metropolis Healthcare's first new advanced diagnostic test center
या अत्यंत नवीन निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना कन्सल्टंट गायनॉकॉलॉजिस्ट आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती साने म्हणाल्या,"निदान चाचण्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असलेल्या चंद्रपूर मधील या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. वेळेवर आणि परिणामकारक उपचार करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी आणि सामुदायिक आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत दर्जेदार तसेच सुलभ निदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. या उपक्रमामुळे केवळ सुलभतेची कमतरता दूर होईल, असे नाही तर आरोग्यसेवा व्यावसायिकांना पूर्ण माहितीसह वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी आवश्यक साधनांचे बळ मिळणार आहे."

मेट्रोपॉलिस  हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेंद्रन चेम्मेनकोट्टिल म्हणाले, चंद्रपूर शहरात या जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेचे होणारे उद्घाटन हे निदानातील अचूकता आणि सुपर-स्पेशालिटी पॅथॉलॉजीची तज्ञता दूरदूरच्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या सध्याच्या मिशनला अनुरूप आहे. टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये दर्जेदार निदान सेवांची उपलब्धता मर्यादितच आहे, आणि या नवीन प्रयोगशाळेच्या स्थापनेमुळे, आम्ही या कमतरतेवर उपाय योजून ती दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.चंद्रपूरमध्ये अशी सुविधा असणे हे निश्चितच शहराच्या आरोग्य सेवा प्रणालीसाठी वरदान सिद्ध होईल. शिवाय,आजूबाजूच्या गावांतील रहिवाशांना यामुळे त्यांच्या घरापासून वाजवी अंतरावर सर्वोत्तम निदान सेवा,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध होतील."

मेट्रोपॉलिस हेल्थकेअर (पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र) च्या लॅबोरेटरी ऑपरेशन्सच्या  प्रमुख डॉ स्मिता सुडके म्हणाल्या की मेट्रोपॉलिस  डायग्नोस्टिक टेस्टिंग सेंटर हे सर्वसामान्य दैनंदिन पॅथॉलॉजी चाचण्यांपासून ते सर्वात क्लिष्ट अशा मोलेक्युलर डायग्नोस्टिक टेस्ट्सपर्यंच्या विस्तृत चाचण्या निश्चित करून वाजवी दरात त्यांचा अहवाल देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. आमच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल व्यावसायिकांसह, आम्ही अचूक निदान आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेत नवीन मापदंड स्थापन करण्यास तयार आहोत.चंद्रपूरमध्ये ही प्रयोगशाळा सुरू करण्यासोबतच आजार शोधण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर रुग्णांना मदत करण्यासाठी आम्ही स्थानिक रुग्णालये, विशेषज्ञ, चिकित्सक आणि सरकार यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी ही भारत आणि परदेशात आणि अनेक दशकांच्या अनुभवासह अनेक दर्जेदार अॅक्रेडिशिन्ससाठी ओळखली जाते. मेट्रोपॉलिस ने विविध चाचण्यांसाठी जाणीवपूर्वक रेफरंस रेंज विकसित केली असून ती आता भारतातील हजारो प्रयोगशाळांमध्ये वापरली जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment