Ads

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस पत्रकार दिन म्हणून घाटंजी नगर परिषद येथे साजरा

घाटंजी: मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून नगर परिषद घाटंजी कार्यलयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते.
Birth anniversary of Acharya Balshastri Jambhekar, father of Marathi journalism celebrated as Journalist Day at Ghatji Nagar Parishad
कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेचे बदललेले स्वरूप याबाबत लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे. ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी अमोल माळकर यांनी दिली. त्या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून, मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहिती आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये कायम असल्याचे सांगितले.पत्रकारिता क्षेत्रात नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार यांना शाल, श्रीफळ, डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.तसेच सर्व पत्रकार बांधवाना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी
अमोल माळकर, लेखापाल प्रवीण हातमोडे, कार्यालय अधीक्षक ,प्रकाश घोती, पाणीपुरवठा अभियंता श्रीमती निकिता देशमुख,अभियंता नितीन बोपटे,बंटी गवई, दत्ता उरकुडे, दत्ता पेटेवार, आशिष गिरी, गोडे काका आदींसह मान्यवरांची उपस्थिती होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment