Ads

चंदनखेडा येथे हाॅप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे थाटात उद्घाटन

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शौर्य क्रिडा मंडळ व उत्फृर्त क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथील दैत्यराज उर्फ माधवराव महाराज किल्ला परिसरातील मैदानात आज दिनांक २८ जानेवारी २०२४ ला भव्य हाॅप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष मनोहर हनवते महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा हे होते.Grand Opening of Half Speech Tennis Ball Cricket Match at Chandankheda
उद्घाटक मारोती गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य चंदनखेडा - मुधोली क्षेत्र. समिरखान पठाण पोलिस पाटील चंदनखेडा, प्रमुख पाहुणे:- चंद्रशेखर निमजे, माजी उपसरपंच, डेव्हिड बागेसर, माजी उपसरपंच, अनिल चौधरी सामाजिक कार्यकर्ता, विठ्ठल हनवते माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक, शाहरुख पठाण, सामाजिक कार्यकर्ता, राहुल मालेकर, युवासेना तालुका प्रमुख भद्रावती, प्रकाश सोनुले सामाजिक कार्यकर्ता चंदनखेडा हे प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते महामानवांच्या फोटो चे पुजन व दिपप्रज्वलन करून हाॅप स्पिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन खेडाळूंना खेळाचे महत्त्व,यावर प्रकाश टाकला.उद्घाघाटन आटोपताच उद्घाटनिय सामना हा विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा)व युवा मंडळ चंदनखेडा यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हनवते यांनी केले. तर आभार देविदास चौखे यांनी मानले . यावेळी शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष शुभम भोस्कर, उपाध्यक्ष शुभम झिंगरे, सचिव कुणाल ढोक,निकेश ढोक, देवानंद पांढरे, आशिष बारतीने, प्रविण भरडे,सुचित ढोक,वंश कोहळे,शरद श्रीरामे,सुरज गोहणे, अनिकेत भुरेवार, भुपेश निमजे,सोरभ बगडे,भुषण वाटेकर, मयुर नन्नावरे,अंकित सोनुले, वैभव भरडे, आशिष हनवते प्रामुख्याने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment