Ads

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करा.

चंद्रपुर :-महाराष्ट्र राज्यात ऊस, सोयाबीन, मिरची, कापूस, धान, इतर कडध्यान व फळबागांसह इतरही पिकाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर घेतले जाते. रब्बी हंगामातही अनेक शेतकरी पिकाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांचा हातभार घेतल्या शिवाय शेत पिके घेता येत नाही. मात्र यावेळी शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यास शेतकऱ्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जाते. परंतु शेतीचे काम करीत असलेल्या शेतमजुराचा अपघात झाल्यास त्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जात नाही. यामुळे शेतमजुरांवर अन्याय होत आहे.
Late .Gopinath Munde Include farm laborers in the Farmers Accident Safety Grant Scheme.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या कार्यकक्षा वाढवुन शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचाही समावेश करून गेल्या वर्षभरात राज्यात शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु अथवा अपंगत्व आलेल्या सर्वशेतमजुरांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा याबाबतचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असुन याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल याबाबतचे आश्वासन मुंडे यांनी भटारकर यांना दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment