भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख): तालुक्यातील हनुमान नगर,बंगाली कॅम्प येथील श्री बजरंग बली हनुमान मंदिर या ठिकाणी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 192 वा जयंतीचा कार्यक्रम प्रबोधनात्मक विचार तसेच भक्ती गीतांनी उत्साहात पार पडला. Savitribai Phule, a true pioneer of equality between women and men - Mrs. Pallavi Thackeray
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राजूभाऊ बोरकर यांनीआईचे महत्व विशद करून सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विवेकानंद महाविद्यालय येथील प्रा. अमोल वा. ठाकरे यांनी सावित्रीबाईंचे जीवन चरित्र विशद केले तसेच उपस्थित सर्व आया- बहिणींना प्रबोधनाद्वारे सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्त्या सौ.पल्लवी अमोल ठाकरे यांनी " राष्ट्र विकासात महिलांचा जो वाटा आहे याचे सर्व श्रेय श्रीमती सावित्रीबाई फुले यांना जाते.शिक्षणाशिवाय स्त्री पुरुष समानता अपूर्ण आहे; तेव्हा स्त्री जीवनात शिक्षणाचे अमृत ओतून,खऱ्या अर्थी स्त्री उद्धाराचे महान कार्य सावित्रीबाईंनी केले.म्हणूनच स्त्री - पुरुष समतेच्या खऱ्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले होय". असे मौलीक विचार अध्यक्षीय भाषणातून त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन सौ.जिजाबाई धाबेकर यांनी;तर आभार प्रदर्शन सौ.अर्चनाताई आरेकर यांनी केले.उपस्थित महिला वर्गांनी सुंदर भक्तीगीते सादर केली.याप्रसंगी मा.रमेश धाबेकर,मा.अशोक मंदोगडे, सौ.सिंधुताई गेजिक , अमित मंदोगडे, सौ.सोनाली आरेकर यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळ चे भाविक भक्तगण तसेच हनुमान नगर वार्डातील संपूर्ण महिला -भगिनी . बहुसंख्येने उपस्थित होत्या.
0 comments:
Post a Comment