भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती शहरातील शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा फेरीलैंड स्कूलचे संचालक एडवोकेट युवराज धानोरकर यांची शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदावर नियुक्त करण्यात आली आहे.
Ad. Yuvraj Dhanorkar appointed as Chandrapur district organizer of Shiv Sena Shinde faction.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. एडवोकेट धानोरकर यांची ही नियुक्ती पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जिल्ह्यातील तळागाळात पोहोचून पक्ष संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात पक्ष संघटनेचे प्रामाणिक कार्य करून पक्ष संघटना अधिक मजबूत कशी करता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असे यावेळी एडवोकेट युवराज धानोरकर यांनी सांगितले आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे हर्षल शिंदे, प्रफुल्ल सारवान,आशीष शर्मा, जमील शेख,नरेश काळे,मिनल आत्राम तथा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment