(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- निवडणूक कामात प्रशासन व्यस्त असल्याची संधी साधून छुप्या पद्धतीने अवैध रेती चोरीचे प्रकार सुरू असल्याचे माहीती मिळताच. सिंदेवाही तहसीलदार पानंमद हे तालुक्यातील प्र त्येक रेती घाटावर करडी नजर ठेवून असताना आज दिनांक 30 मार्च च्या पहाटे 5 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव रेती घाट मार्गावर सदर ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच -34 ,BV-7033 हे असल्याचे निदर्शनास आले.
A tractor transporting illegal sand was caught
तहसीलदार यांनी सदरील वाहन अडवून पाहणी केली असता सदर ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास अवैध रेती मिळून आली. यावेळी पंचनामा करून ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा केला आहे. ही कारवाई आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली असुन सदर ट्रॅक्टर मालकावर गौण खणीजाची लूट केल्या प्रकरणी गौण खनिज कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई साठी चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तसेच सदर कारवाई नंतर तहसिलदार संदीप पानंमद यांनी अवैध गौण खनिजांची लूट करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे बोलून दाखविले आहे.
0 comments:
Post a Comment