Ads

चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे अज्ञात इसमाची हत्याMurder of unknown person at Chandrapur railway station

चंद्रपुर :- Crime news चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Murder of unknown person at Chandrapur railway station
       मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन येथे आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर वय २४ वर्ष रा. विठ्ठल मंदिर वार्ड लिंबाडकर वाडी चंद्रपूर हा रेल्वे स्टेशन येथील तिकीट घर येथे एका बाका वर झोपून होता. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने ने आरोपी याचे पँट व शर्ट चे खिसे तपासत होता. तसेच आरोपीचा दुपट्टा आपल्या गळ्यात टाकून आणखी त्याचे खिसे तपासायला लागला. त्यातच आरोपीला जाग येऊन अज्ञात व्यक्ती ला याबाबत विचारले असता दोघात बाचाबाची झाली. त्यात आरोपी साहिल उर्फ माट्या राजु आंबेकर ने आपल्या जवळील चाकू ने अज्ञात व्यक्ती वर चाकू हल्ला केले. ही माहिती मिळताच चंद्रपूर येथील आरपीएफ ने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केले. उपचार दरम्यान अज्ञात व्यक्ती चे मृत्यू झाले. आरोपी साहिल उर्फ माट्या हा हत्या करून फरार झाला होता. 
       दरम्यान बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथील जीआरपी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू करून आरोपीला दोन तासात अटक केले. घटनास्थळी लोहमार्ग नागपूर चे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले.
       पुढील तपास लोहमार्ग नागपूर चे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली वर्धा रेल्वे स्टेशन चे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल चापले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारनवरे, पो. ह. खडतकर,  पोशी पंकज भांगे, संदेश लोणारे, मपोशी किर्ती मेश्राम करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment