वरोरा प्रती :-दोन दिवसांपूर्वी वरोरा टाइम्सने ठाणेदार साहेब "त्या" अण्णाला आवरा अशी बातमी प्रकाशित केली होती. ती बातमी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असता वरोरा पोलिसांनी कारवाईची भूमिका बजावत थातूर मातूर कारवाई करून अण्णाच्या दोन सट्टेबाजांना अटक केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय असताना दोनच सट्टेबाजांवर कारवाई होणे हे संशयास्पद असून अण्णाचा खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय सुरूच असल्याचे दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा वरोरा पोलिसाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वरोरा शहरात गल्लोगल्ली, चौका -चौकात तसेच पान ठेवल्यावर खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असून यामुळे अनेक कुटुंब बरबादीच्या उंबरठ्यावर उभे आहेत यातच बाहेरगावचा असणारा अण्णा या इसमाने तर कहरच केला आहे वरोरा शहरात दमदार एन्ट्री करत सट्टापट्टी लावणाऱ्या ग्राहकांना चढाभाव देऊन जास्तीत जास्त ग्राहक आपल्या धंद्याकडे कसे वळतील याकडे त्याचे लक्ष आहे
बोर्डा चौक ,रत्नमाला चौक, तसेच साई मंगल कार्यालय परिसर सब्जी मंडीचा परिसर या ठिकाणी आपल्या धंद्याचे जाळे पसरविले असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सट्टेबाजांची गर्दी पहावयास मिळते. शहरातच नव्हे तर बाहेरील ठिकाणी काही गावखेड्यात सट्टापट्टीचा व्यवसाय सुरूअसल्याची खात्रीदायक माहिती वरोरा टाइम्सच्या हाती आली आहे. वरोरा पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जाते, आता सट्टापट्टीच्या धंद्यावर ठाणेदार साहेब काय ठोस भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment