Ads

घाटंजी तालुक्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर ,पाणी प्रश्न सोडविण्या करिता वंचित आघाडी करणार पाण्यासाठी आमरण उपोषण

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-
घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गट ग्रामपंचायत निंबर्डा येथे पाणी प्रश्न पेटला आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत पाणी पुरवठ्याचे अपूर्ण कार्यामुळे मौजा निंबर्डा येथे भिषण पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे.
On the resolution of water issue in Ghatji taluka, the deprived front will go on a hunger strike for water to solve the water issue.
गट ग्राम पंचायत तीवसाला क्षेत्रातील निबर्डा येथील आदिवासी समाज बांधव आपल्या मोल मजुरी कडे दुर्लक्ष करून अनेक महिला भगिनी तथा लहान मुलांना तीन ते चार किलोमीटर वरून पाण्या करिता भटकंती करावी लागत आहेत.या सर्व बाबीला जबाबदार कोण ?मी स्वतः अनेक वेळा ग्राम पंचायत सदस्य या नात्याने ग्राम पंचायत सचिव ,सरपंच तथा पंचायत समिती कडे वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊन सुध्दा जल जीवन योजनेचे असलेले अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही.वेळोवेळी पाठपुरावा करून सुध्धा उडवा उडवीचे उत्तरे मिळतात.शाशना कडून वेळीच जर या बाबीची दक्खल घेतल्या गेली असती तर आज ही पाण्याची गंभीर समस्या उद्भवली नसती.म्हणून येथील जनतेची पाण्याची समस्या दूर व्हावी व नळ योजनेचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या करिता झोपेचे सोंग धारण केलेल्या शासनाचे लक्ष वेधन्याकरिता *घाटंजी तालुक्यातील व निबर्डा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आता वंचित आघाडीचे महासचिव तथा ग्राम पंचायत सदस्य नितीन भिमरावजी राठोड हे दिनांक १३/०५/२४ रोज सोमवार ला सकाळी ११ वाजता मौजा निबर्डा येथे वंचित आघाडीचे घाटंजी तालुका अध्यक्ष तरुण तडपदार तथा निर्भिड व्यक्तिमत्व असलेले संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शन पर आमरण उपोषण करणार आहेत.संपूर्ण घाटंजी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्या करिता वंचित लावणार पाण्यालाही आग*
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment