चंद्रपूर : शासनाकडून वाटपात मिळालेल्या जमिनीची विक्री करता येत नसतानाही काही व्यक्तींनी माझी दिशाभूल करून जमिनीची अनधिकृत विक्री असा आरोप करीत माझी जमीन परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी सुबोध महेशकर यांनी बुधवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
बल्लारपूर येथील सर्व्हे क्रमांक ३०/६० येथील जमीन भोगवटादार वर्ग २ मधील असून कुळ कायद्याने ही जमीन प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ३६ व ३६ अ अन्वये ही जमीन वाटपात मिळाली. ही जमीन सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही. असे असतानाही दिशाभूल करून श्रीहरी अंचुरी, बादल उराडे आणि सुमित डोहणे हे या जमिनीवर प्लॉटपाडून विक्री करीत असल्याचा आरोप सुबोध महेशकर यांनी केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिल्याची माहिती महेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
0 comments:
Post a Comment