भद्रावती(जावेद शेख )तालुका प्रतिनिधी:-एका अज्ञात ट्रकच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू झाला तर एक म्हैस गंभीर झाल्याची घटना दिनांक 21 रोज मंगळवार ला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान शहरातील हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घडली. घटनेनंतर अज्ञात ट्रक फरार झाला.
Two buffaloes were killed and one injured in a collision with an unknown truck
जखमी म्हशीला वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगतच्या एका झाडाखाली हलवून व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सदर जखमी म्हशीवर उपचार करण्यात आले. घटना घडल्यानंतर वाहतूक पोलीस अंकुश खंडाळे यांनी बॅरिकेट लावून एका बाजूचा रस्ता तात्पुरता बंद करून जखमी म्हशीला अभय दिले. मात्र सदर म्हशींच्या मालकाचा अद्याप शोध लागला नसून वाहतूक पोलीस म्हशींच्या मालकाचा शोध घेत आहे. नागपूरवरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने या म्हशींना जोरदार धडक दिली या अपघातात दोन म्हशिंचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. सदर घटनेचा पुढील तपास वाहतूक पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment