Ads

रजनीकांत बोरेले यांच्या निवासस्थानी प्रमुख महिला नेत्यांची बैठक संपन्न- नीता ताई मडावी

(बोरेले)प्रतिनिधी :पांढरकवडा येथे केळापुर - आर्णी मतदार संघातील प्रमुख महिला नेत्यांची बैठक झाली आहे.

Meeting of prominent women leaders concluded at Rajinikanth Borele's residence- Neeta  Madavi
सदर बैठक रजनीकांत डालूरामजी बोरेले प्रसिद्ध व्हिसल ब्लोअर, आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या डी. एस. बोरेले नावाने प्रसिध्द निवासस्थानी दिनांक 22/5/2024 दुपारी 1 वाजता बैठकीला प्रारंभ झाली या बैठकीला सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख महिला नेत्यांची उपस्थिती होती.
हया बैठकीला प्रथम सौ. नीता ताई मड़ावी (बोरेले) यांनी महिलांच्या विविध प्रश्नांवर संबोधित केले आहे
तर रजनीकांत बोरेले यांनी महिला यांनी सक्षम नेतृत्व करण्या पासून ते संपूर्ण मतदार संघात संघटने ला मजबूत करण्या बाबत हया महिला रणरागिनीनां तीन तास संबोधीत केल आहे.
पुढे रजनीकान्त बोरेले यांनी मतदार संघाच्या 40 वर्षातील उदासीन धोरना बाबत सांगितले असून मतदार संघाचा विकास आणि मतदारांचा आर्थिक विकास झाला नाही मात्र जे लोक प्रतिनिधि या मतदारसंघातुन निवडुन गेलेल्यांचा भरपूर विकास झाला आहे.
कोणी 25, वर्ष प्रतिनिधित्व केले तर कोणी 10, वर्ष तर कोणी 5, वर्ष प्रतिनिधित्व केले आहे .मात्र विकास शून्य आहे.ऐकून 40, वर्ष लोकप्रतिनिधि नी आळी - पाळी ने सत्ता भोगली आहे. परंतु किती साखर कारखाने,सुतगिरणी,
सोयाबीन प्लांट आणले आहे हजारो शेतकार्यांनी 21,वर्ष 5, महिन्यात आत्महत्या केली आहे.त्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्या साठी किवा जोड़ व्यवसाय करिता उपयोजना आखल्या आहे का ? हा मतदारसंघ बऱ्याच काळापासून राखीव आहे पण पाहिजे तसा विकास झाला नाही
सौ नीता मड़ावीताई (बोरेले) यांनी सन 2004 मध्ये शेतकार्यांच्या विविध रास्त मागणी ला घेवून वि उच्च न्यायालयात याचिका दाख़िल केली होती. त्यात आम्ही नमूद केले होते की शेतकरी यांच्या मागणी कडे गंभीरतेने लक्ष दिले नाही तर आत्महत्याचा उद्रेक होईल. परंतु ह्या सत्ता भोगुनी लक्ष दिले असते तर कदाचित शेतकरी यांच्या आत्महत्याचा महापुर मतदार संघा मध्ये आला नसता.हे तेव्हढेच खरं आहे परंतु त्याच चेहराला संधी देऊन मतदार संघाची यांनी वाट लावली आहे
या शिवाय तरुण युवक,युवती उच्चशिक्षित असून देखील 10 ते 20 हजार रुपयेच्या खाजगी रोजगार करिता विविध महानगरी मध्ये गेले आहे.आणि पुढारींचे मूल (A. C.) मध्ये विश्रांती घेवून आमदार /मंत्री होण्याची स्वप्न मुंगेरीलाल सारखे बघत आहे.ही बाब अत्यंत दुखाची आहे.नागरिकांनी प्रश्न विचारा तुमच्या वडिलांनी किती विकास केले आहे.
आम्ही अनेक ठिकाणी सभा घेतली आहे.प्रचंड समर्थन बंधु बघीनिंचे व तरुण युवकांचे मिळत आहे.पुढे सुद्धा अनेक गावात सभा घेवून पुढारींची "पोल खोल" करण्याचा मानस आमचा आहे.
अश्या विषय वर 3 तास उपस्थित मुख्य महिला नेत्यांना रजनीकांत बोरेले यांनी संबोधीत केल्याने उपस्थित महिला मंत्र मुग्ध झाल्या आणि संघटनेला बळकट करण्यासाठी अभीवचन देवून पाठिंबा दिला आहे. ही बैठक अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती.रजनीकांत बोरेले यांच्या संघटनेला मिळत असलेला पाठिंबा मुळे विधान सभा निवडणूक मध्ये बासिंग बांधून बसल्याचे तंबूत घबराटीचे सावट पसरले आहे हे विशेष
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment