चंद्रपुर :-चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई नदी खोलीकरणासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाऊस येण्याच्या 10 दिवसापूर्वी सूचना केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.जोरगेवार हे स्थानिक असल्यामुळे त्यांना सन 1986,2006,2013 च्या महापुराची कल्पना आहेच व इरई नदी गाळेने पूर्ण बुजली असल्यामुळे आता प्रत्येक वर्षी 2022,2023 च्या महापुराने जनता त्रस्त झाली आहे हे माहित असूनही व इरई बचाव जनआंदोलन सन 2006 पासून नदीच्या खोलीकरणासाठी कित्येकदा निवेदन,जल सत्याग्रह करुन लढा देत असल्याची कल्पना असूनही व 2019 पासून आमदार असूनही त्यांनी यावर्षी विधानसभा निवडणूक पूर्वी व पावसाळ्याला मोजके दिवस शिल्लक असतांना ही मागणी करुन व सन 2020 साली 50 कोटी रुपये इरई खोलीकरणासाठी त्यांच्या प्रयत्नाने मिळाल्याचे फलक शहरभर लावले होते ते 50 कोटी कुठे गेले त्याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी जनतेची मागणी आहे.अन्यथा ते फलकबाज व प्रसिद्धीबाज आमदार असल्याचे स्वतःच सिद्ध करीत आहे असे जनतेचे मत आहे.
Public flood, people's representatives shine in the limelight
आमदार जोरगेवारच नाही तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी प्रशासनाला इरई व झरपट नदी आराखडा बनविण्याच्या सूचना दिल्या.जर आराखडा तयार नव्हता तर 9 एप्रिल 2016 रोजी 8 वर्षांपूर्वी इरईच्या दाताळा पुल नदी पात्रात भव्य कार्यक्रम घेऊन " इरई पुनःरूजीवन" ची घोषणा करणं जनतेला मूर्ख बनविणे नाही का? असा सवाल इरई बचाव जनआंदोलनाचे जनक कुशाब कायरकर यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधीनीं अफगाणिस्थान या गरीब देशा कडून बोध घ्यावा ज्यांनी कित्येक किलोमीटर कुत्रिम नदी आपल्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याची ,सिंचनाची सोय करुन वाळवंटात शेती करण्यासाठी सिमीत राशी व अगदी जुन्या ट्रॅक-ट्रॅक्टर चा वापर करीत वाळवंटात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.या उलट चंद्रपूर-विदर्भ-महाराष्ट्र व देशात बारमाही वाहणाऱ्या शेकडो नद्या असूनही जनतेला उन्हाळ्यात ट्यान्कर द्वारे पाणी दिल जाते. पाणी घोटाळा हाही वेगळा विषय होऊ शकतो.केंद्राची "हर घर पिनेके पानिका नल किंतु बगेर जल " "Every house with dinking tap but without drinking water"अशी हास्यास्पद अवस्था लोकप्रतिनिधिनी करुन ठेवली आहे.देश,महाराष्ट्र व चंद्रपूरात आधुनिक 6 व 8 पदरी रस्ते,भवन, इन्फ्रास्ट्रॅक्चर यालाच महत्व देण्यात येत आहे परंतु निसर्गाने देशाला दिलेल्या नद्या कळे आम्ही दुर्लक्ष करीत आहो त्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना आता व भविष्यातही करावा लागणार आहे. विना विफूल पाणी, जलसंपन्न असल्याशिवाय भारत कधीही महासत्ता बनू शकत नाही असे मतही कुशाब कायरकर यांनी व्यक्त करीत इरई बुजल्यामुळे व लोकप्रतिनिधी-प्रशासनाच्या अक्ष्मय दुर्लक्ष,खोलीकरण न झाल्यामुळे जनतेला सावधान राहण्याचे आवाहन करीत 2024च्या पावसाळ्यात जनता महापुरात बुडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.कायरकर यांनी सन 2006,2013,2022 व 2023 वर्षी महापुराचे केलेले भाकीत खरे ठरले आहे परंतु जनतेचे पुरामुळे होणारे हाल पाहवल्या जात नसल्याने 2024 चे भाकीत खरे ठरू नये ही मनस्वी इच्छा त्यांनी दै.--- जवळ बोलतांना व्यक्त केली.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment