Ads

एच एस सी निकालात शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश…

जावेद शेख तालुका प्रतिनिधी
भद्रावती:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत आज बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीने नेत्र दीपक यश संपादन केले आहे.
Spectacular Success of Shinde Junior College in HSC Result…
आज जाहीर झालेल्या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा 98.73% निकाल लागला आहे . यात संजना गुरचल हिने 89.50% गुण प्राप्त करत महाविद्यालयात व तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर श्रेयश नगराळे व ध्रुव गढीया या विद्यार्थ्यांनी 89.33% गुण घेत तालुक्यात व महाविद्यालया द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे . मानस प्रभाकर पारधी या विद्यार्थ्यांने 84.83% गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थ्यांनी 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करून यशस्वी भरारी घेतलेली आहे.

याच कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाल 91.37% लागला असून तालुक्यात अव्वलस्थानी आहे. यात अनुष्का देवगडे या विद्यार्थिनीने 80 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पायल प्रकाश मेश्राम या विद्यार्थ्यांनी 89.33% गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर रितिक मुसावत या विद्यार्थ्याने 75 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.


यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील कला शाखेचा निकाल हा 76 टक्के लागला असून कुमारी जान्सूहवी सूर्यवंशी या विद्यार्थिनीने 79 टक्के प्राप्त करत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर दिया सेनगुप्ता या विद्यार्थिनीने 72.83% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून द्वितीय क्रमांकावर आहे. साक्षी ठावरी ही विद्यार्थिनी 71.83% गुण घेत महाविद्यालयात तृतीय क्रमांकावर आहे.

एमसीव्हीसी विभागाचा निकाल हा 80 टक्के लागला असून तालुक्यात अवस्थानी आहे. यात कुमारी श्वेता क्षिरसागर हिने 79.50% गुण घेत तालुक्यात व महाविद्यालयात प्रथम क्रमांक घेतला आहे. तर कुमारी गायत्री खामनकर व वैष्णवी मारेकर यांनी 70 टक्के गुण घेत महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक घेतला आहे.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे शैक्षणीक व क्रिडा क्षेत्रा तालुक्यात सातत्याने अव्वल राहत असुन तालुक्यात उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. एच एस सी निकालात यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ . विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, शेखर जुमडे, अतुल गुंडावार, किशोर चौधरी समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment