(सादिक थैम)वरोरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज शनिवार दि.१५ जून रोजी आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याकडे चक्क शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे सदर मेळाव्याची रंजक चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शनिवार दिनांक १५ जून रोजी बाजार समितीच्या मोहबाळा रोडवरील राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात शेतकऱ्यांना पारंपारिक व नवीन पिके आधुनिक पद्धतीने घेणे, शासनाच्या विविध योजनांची व शेतीपूरक उद्योग व्यवसायाची माहिती देऊन त्यांना उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन तथा करणे करण्यात येणार होते. तसेच प्रगतशील शेतकरी आणि व्यापारी यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सदर मेळाव्यात करण्यात येणार होता. परंतु या मेळाव्यात अपेक्षित ५०० शेतकऱ्यांनी ऐवजी केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. याततील बारा प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. तर दहा कापूस व्यापाऱ्यांचा सत्कार ठेवला असताना केवळ तीनच व्यापारी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे उद्घाटक जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी देखील या मेळाव्याला दांडी मारली. कृषी उत्पन्न बाजार समितीची डॉक्टर विजय देवताळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला सुहास पोद्दार आणि डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी देखील या मेळाव्याला उपस्थित नव्हते. सहकारी संस्था चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे , पंचायत समितीचे कृषी अधिकारी गजानन हटवार यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली आणि मार्गदर्शन केले. परंतु अनेक संचालकांनी या मेळाव्याला दांडी मारण्याचे दिसून आले. चक्क शेतकऱ्यांनीच या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने याची रंजक कथा चर्चा सोशल मीडियाच्या अनेक व्हाट्सअप ग्रुप वर दिसून आली.
ह तर बाजार समितीचे अपयशच
शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळाव्यातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती होते. तसेच उत्पन्न वाढीसाठी काय करायला हवे याचेही मार्गदर्शन मिळते. यामुळे असे मार्गदर्शन मिळावे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असतात आणि शेतकरी त्याला आवर्जून उपस्थित राहतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याला शेतकऱ्यांनी दर्शवलेली नगण्य उपस्थिती आश्चर्यकारक आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित सदर मेळाव्याकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ बाजार समितीचे अपयश आहे असा आरोप करून यासाठी नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजेंद्र चिकटे आणि चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment