चंद्रपूर :- रामोजीराव यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्रातील एक अजातशत्रू गमविला असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा कवी तथा भाजपा नेते महेश कोलावार यांनी केले आहे.
With the death of Ramojirao, the film industry has lost a nemesis - Mahesh Kolawar
रामोजीराव यांच्या निधनाबद्दल आपली शोककळा व्यक्त करतांना कोलावार यांनी म्हणाले की वयाच्या ८७ व्या वर्षीही चिरतरुणसारखे काम करणारे ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते.
आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात मध्यवर्गीय कुटुंबात चेरुकुरी रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी एका कृषी कुटुंबात झाला.आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी असलेली रामोजी फिल्म सिटीची स्थापना त्यांनी केली.तब्बल २ हजार एकरात १९९६ साली ही रामोजी फिल्म सिटी सुरु करण्यात आली.त्यासोबतच ते इनाडू दैनिकाचे संपादक,उषाकिरण मुव्हिजचे चित्रपट निर्माते,रामोजी फिल्मसिटीचे मालक,प्रिया पिकल्स,प्रिया फूड्स,रमादेवी पब्लिक स्कूल व
कलांजली शाॅपिंग मालचे संचालक,मार्गदर्शी चिट फंडचे अध्यक्ष,डाॅल्फिन ग्रृफ ऑफ हाॅटेल्सचे मालक आणि इ.टिव्ही सारख्या देशातील अग्रगण्य मिडिया संस्थेचे सर्वेसर्वा आहेत.
आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात सगळ्यात जास्त खपणा-या (सेलिंग) इनाडू दैनिकाचे संपादक व इ.टिव्ही नेटवर्कच्या माध्यमातून हजारो कामगारांना रोजगार देणारे व संस्थेतील प्रत्येक पत्रकाराला,कलाकाराला,दिग्दर्शकाला व कामगारांना न चुकता महिण्याच्या आतमध्येच सॅलरी देणा-या अत्यंत विश्वसणीय इ.टिव्ही ग्रृपचे अध्यक्ष,उषाकिरण मुवीज लिमिटेडद्वारे
मयूरी (तेलुगू),पाकरतिनू पाकरन (मल्याळम), प्रतिघाट (हिंदी),डाॅ.मुनशिर डाॅयरी (बंगाली),चित्रा (कन्नड),इनिंदू इनिंदू कादल इनिंदू (तमिळ) यांसारख्या ६ भारतीय भाषेत जवळपास ८० चित्रपटांचे निर्माण कार्य केलेले देशातील अग्रगण्य निर्माते आणि रामोजी फिल्म सिटीसारख्या (१२००० कामगार,८००० एजंट) जगातील सगळ्यात मोठ्या स्टुडीओचे निर्माण करुन 'गिनीज बुक ऑफ बर्ल्ड रेकार्डमध्ये' स्थान मिळविलेले जगातील एकमेव स्टुडीओ मालक म्हणून त्यांची किर्ती ही अपार आहे.
रामोजीराव यांना दोन मुले असून मोठा मुलगा किरण प्रभाकर हे उद्योगपती व धाकटा मुलगा चेरुकुरी सुमन हे अभिनेते व दिग्दर्शक होते. चेरुकुरी सुमन यांचे ७ सप्टेंबर २०१२ रोजी कर्करोगाने निधन झाले.
रामोजीराव यांना तेलुगू चित्रपटातील कामांसाठी दक्षिणेतील चार फिल्मफेअर पुरस्कार,पाच नंदी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.२०१६ मध्ये त्यांना पत्रकारिता,साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मविभूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनेकांच्या अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत पेटविलेल्या या दिग्गज व ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे आज सकाळी हृदयविकारामुळे ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. भारताच्या औद्योगिक व चित्रपट क्षेत्रासाठी ही खूप मोठी हानी आहे अशी भावना महेश कोलावार यांनी यावेळी व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment