खांबाडा - जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:- शिवसेना तालुका प्रमुख-दत्ताभाऊ बोरेकर, युवासेना तालुका समन्वयक-शुभम कोहपरे तसेच युवासैनिक तुषार बोरेकर यांनी सतत आगार प्रमुखांना निवेदने तसेच मागणी करुन वडगांव या गावाला बस सेवा चालू करण्यात आली. गावकऱ्यांना मधे एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व वडगांव वासियानी शिवसेना तालुकाप्रमुख-दत्ताभाऊ बोरेकर,युवासेना तालुका समन्वयक-शुभम कोहपरे व सतत पाठपुरावा करणारा युवासैनिक-तुषार बोरेकर व वरोरा आगार विभागाचे धन्यवाद करत. बस चे पूजन आणि स्वागत सुध्दा करण्यात आले.
काही काळापूर्वी वडगांवला बस सेवा चालू होती परंतू मधल्या काळात ती बंद केली. बस सेवा बंद असल्याने गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या मुळे वडगांव वासियांनी शिवसेना तालुका प्रमुख-दत्ताभाऊ बोरेकर तसेच युवासेना तालुका समन्वयक-शुभम कोहपरे यांना हि माहिती दिली वेळेचा विलंब न करता शिवसेने तर्फे आगार प्रमुख वरोरा यांना बस सुरु करण्याची मागणी करण्यात आली.आगार प्रमुख साहेबांनी हि मागणी पुर्ण केली .गावाला बस चालू झाली हे कळताच गांवकरी मंडळीमधे उत्साह तयार झाला आणि बसच्या स्वागता करिता बस स्थानका जवळ गोळा झाले. या स्वागताला उपस्थित गुणवंतजी कोकांडे, रमेशजी दातारकर, सतीशजी बोरेकर, भास्करजी उईके, प्रकाशजी कोकांडे, सुनीलजी मडावी, गुणवंतजी बोरेकर, नत्थुजी पोंगडे, सुरेशजी बोरेकर, विलासजी डावे, संजयजी पेटकर, विजयभाऊ धोटे, शुभमभाऊ कोकांडे, राकेशभाऊ पेटकर, अजय दातारकर, तुषार बोरेकर, प्रशांत धोटे, रोहन गोचे, वैभव बोरेकर, साहिल लडके आणि संपूर्ण वडगांववासी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment