Ads

जनावरांची तस्करी करणारा ट्रक पकडला, एका आरोपीस अटक.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे कत्तलखान्यात घेऊन जात असलेला जनावरांचा एक ट्रक पकडला असून ट्रक मध्ये असलेल्या 24 पाळीव जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे.
Animal smuggling truck caught, one accused arrested.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवे वरील एनटीपीसी समोर केली. याप्रकरणी अब्दुल राजीक अब्दुल रफिक, वय 40 वर्ष, राहणार मूर्तिजापूर या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.गडचिरोली वरून कारंजा कडे जात असलेल्या एका ट्रकमधून पाळीव जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी चंद्रपूर- नागपूर रोडवरील एनटीपीसी समोर सापळा लावला. दरम्यान ट्रक क्रमांक mh34 bg19 89 हा ट्रक घटनास्थळी आल्यानंतर त्याला थांबून ट्रकची तपासणी केली असता त्यात 24 पाळीव जनावरे आढळून आली. या सर्व जनावरांना चंद्रपूर येथील दाताळा रोडवरील प्यारा फाउंडेशनच्या गोशाळेत मुक्त करण्यात आले. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात,पोलीस उपनिरीक्षक किशोर मुडे यांच्या नेतृत्वात गजानन, तुपकर, अनुप आष्टुनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोडे, विलास तलांडे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment