चंद्रपुर:-राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे
महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत.
Protest movement of NCP Mahila Congress Sharad Chandra Pawar party against Uran, Shil Phata women abuse incidents
यामुळे राज्यात महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे
महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या सूचनेनुसार महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणीस राजीनामा द्या राजीनामा द्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, न्याय द्या न्याय द्या यशस्वी शिंदेला न्याय दया अशा घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बेबीताई उईके म्हणाल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आली. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र माता भगिनींना
दरमहा 1500 रूपये देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई वाढलेले गॅस सिलेंडरचे दर यामुळे महिलांना घर खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे आता सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे त्यामुळे महिलांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत.
राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन
राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याचा अब्रु चव्हाट्यावर आली आहे
या दोन्ही घटना अमानवीय असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाच्या आरोपींना फाशीशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले .यावेळी आंदोलनात उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके माजी युवती जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पूजाताई शेरकी जिल्हा संघटिका सरस्वती गावंडे ,जिल्हासचिव नंदाताई शेरकी, जिल्हा सरचिटणीस शोभाताई घरडे, छायाताई चौधरी ,वनिताताई चांदेकर , सुलोचना करणेवार ,अर्चना कामटकर रेशमा मेश्राम, अर्चना वैद्य, सुनीता मडावी, सोनाली मडावी, मालू नन्नावरे महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
0 comments:
Post a Comment