जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून अलमारीत असलेले सोने, चांदी आणि रोख रक्कम असा 98 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील सुरक्षा नगर येथील वराटकर लेआउट येथे उघडकीस आली. भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते अज्ञात चोरट्यांच्या शोधात आहे.
Burglary in Bhadravati city, unknown thieves delayed compensation of 98 thousand five hundred rupees
सुरक्षा नगर येथील वराटकर लेआउट येथे राहणारे कुंदन संजय बोईनवर हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घटनेच्या दिवशी सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात तपासणी केली असता घरातील 23 ग्रॅम सोने 45 ग्रॅम चांदी, नगदी 40,000 असा 98 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याचा आढळला. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर फॉरेन्सिक पथक तथा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा शोध मात्रलागला नाही. कलम331/3,331/4,305/ ए घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment