Ads

केंद्र व राज्य शासनाचे लोकाभिमुख धोरण व योजना मतदारांपर्यंत पोहचवा : हंसराज अहिर

सादिक थैम वरोरा:कार्यकर्ता ही भाजपची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आपल्यात आलेली मरगळ झटकून राज्य केंद्र व राज्य शासनाचे लोकाभिमुख धोरण व कार्यक्रम मतदारांपर्यंत आत्मविश्वासाने पोहोचवा. भाजप बाबत विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांबाबत योग्य माहिती देत भाजपाचा कार्यकर्ता कमजोर नाही हे दाखवून द्या, असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी वरोरा येथे बोलताना कार्यकर्त्यांना केले.
Communicate the people-oriented policies and schemes of the central and state governments to the voters: Hansraj Ahir
येथील साई मंगल कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या स्वर्गीय संजय देवतळे सभागृहात आयोजित भाजपच्या वरोरा तालुका अधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा संघटक महामंत्री संजय गजपुरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय राऊत, प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली, प्रदेश भाजयुमो सचिव करण देवतळे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रमेश राजूरकर, डॉ. भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबा भागडे, वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ सागर वझे, नरेंद्र जीवतोडे, किशोर टोंगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शुभांगी निंबाळकर, सुनीता काकडे, ज्योती वाकडे, संजय राम, युवती आघाडी प्रमुख मोनिका टिपले उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेची दिशाभूल करणे, संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करत जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने केले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर देत सबका साथ,सबका विकास आणि सबका विश्वास हे ध्येय ठेवून कार्य करण्याचे आवाहनही हंसराज अहिर यांनी यावेळी केले.
मंत्री, खासदार,आमदार यासारखी पदे ही अस्थाई आहेत. यांच्यामागे माजी शब्द लागणार असतो. पण कार्यकर्ता हा कधीच माजी होत नाही. तो नेहमीच स्थायी असतो. म्हणून कार्यकर्ता हाच आपल्या पक्षाचा आत्मा आहे असे मत अतुल देशकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
विरोधक जाती-जातीत द्वेष पसरवून आपणास दुबळे बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या या प्रयत्नांना थारा मिळू देणार नाही असा संदेश या अधिवेशनातून भाजप कार्यकर्ता घेऊन जाणार असून यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करावा असे मत संजय गजपुरे यांनी यावेळी व्यक्त केले.
या अधिवेशनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळवून देत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे ऐतिहासिक यश मिळवल्याबद्दल डॉ. सागर वझे यांनी पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव तर बाबा भागडे यांनी राजकीय ठराव मांडला. या ठरावांना अनुक्रमे विनोद लोहकरे व माजी प.स.सदस्या वंदना दाते यांनी अनुमोदन दिले.हे दोन्ही ठराव आवाजी मतदानाने पारित करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने झाल्यानंतर *जय जय महाराष्ट्र देशा* या राज्यगीताने अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. केंद्र व राज्याच्या विविध योजना सांगत भद्रावती तालुकाध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी या सर्व योजना भाजप पदाधिकाऱ्यांमार्फत राबविल्या गेल्या, तर पक्षाला याचा फायदा होईल.याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा अशी सूचना यावेळी मांडली.
यावेळी करण देवतळे, प्रा.विजय राऊत, किशोर टोंगे,डॉ.गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या अधिवेशनात तालुक्यातील दिवंगत झालेल्या 42 पक्ष कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन त्यांच्याप्रती शोक प्रस्ताव पारित करण्यात आला.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रमेश राजूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनात्मक भूमिका मांडताना लोकसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो याचे विस्तृत विवेचन करत आगामी निवडणुकीत एकमताने सज्ज राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन गजानन राऊत यांनी तर सुनीता काकडे यांनी उपस्थिततांचे आभार मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment