भद्रावती : इतर मागास बहुजन कल्याण विभागातील राबविण्यात येणारी लोककल्याणकारी योजनाची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी दि.१५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरीय मेळावा आयोजीत करण्याचे निर्देश शासना कडुन प्राप्त झाले आहे. त्यानुसार नीळकठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती येथे शुक्रवार दि.१६ ऑगस्टला सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर तालुकास्तीय मेळाव्या मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विविध योजनाची माहिती देण्यात येणार आहे. तरी भद्रावती तालुक्यातील नागरिकांनी लोककल्याणकारी योजनेच्या मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चंद्रपूर येथील सहाय्यक संचालक आशा कवाडे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment