चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरित
पोलीस अधीक्षक यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध मोहीम सुरू केले असून या मोहिमेअंतर्गत दिनांक 7/9/2024 रोजी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब ,अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम यांचे आदेशान्वये ,पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोउपनि सामलवार सोबत पोशी ,किशोर वाकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार मपोशी अपर्णा असे मिळून पोस्टे रामनगर परिसरात अवैद्य शस्त्रे व गुन्हेगार शोधमोहीम राबवित
असताना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की, आनंद अशोक धनराज वय 29 वर्षे राहणार म्हाडा कॉलनी याचे घरी तलवार असल्याचे गुप्त माहिती मिळाल्याने दोन पंचांसह घटनास्थळी रवाना होऊन सदर इसमाचे घर झडती घेतली असता त्याचे घरी पलंगाच्या गादी खाली तलवार मिळून आल्याने तलवार व आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पो स्टे रामनगर येथे कलम 4, 25 भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे
0 comments:
Post a Comment