Ads

राजेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

जावेद शेख भद्रावती: तालुक्यातील ग्रामपंचायत कढोली येथील राजेश रमेश शेरूकुरे यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचा गौरव करण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
Election of Rajesh Sherukure as President of Tanta Mukti Samiti
या सत्कार समारंभात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, कढोली शाखेचे प्रमुख सचिन डुकरे, मारोती उपरे, प्रशांत मंगाम, कुणाल जिवतोडे आणि अंकित पावडे उपस्थित होते.

राजेश शेरूकुरे यांची निवड ही ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने झाली असून, त्यांच्या नेतृत्वात गावातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकता आणि समन्वय निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

या प्रसंगी मुकेश जिवतोडे यांनी शेरूकुरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, "गावाच्या प्रगतीसाठी आणि शांतता टिकवण्यासाठी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. राजेश शेरूकुरे यांच्या नेतृत्वात हे कार्य प्रभावीपणे होईल, अशी खात्री आहे."
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment