चंद्रपुर :-चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मुमवका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, मद्य विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या ड्रग्स ची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.
आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी ११.०० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे मोहमद अहमद सिददकी अन्सारी, रा. हनुमान मंदिर जवळ, तुकुम तलाव चंद्रपूर हा एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर घेवून विक्रीकरीता वरोरा नाका पुलीया जवळ चंद्रपुर येथे येणार आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून वरोरा नाका पुलीया चे खाली दबा धरून बसून राहून मिळालेल्या माहितीमधील इसम येताच त्याचेवर मोठ्या शिताफीने छापा टाकून त्यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ ६.४७० ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत १९,४१०/- रूपये, तसेच सदर एमडी पावडर शरीरात घेणेकरीता आवश्यक असलेले इंजेक्शन सिरीन किंमत १००/- रू. असा एकुण १९,५१०/- रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाचे विरूद्ध कलम ८ (क), २१ (ब), एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, नापोअं. संतोष येलपुलवार, पोशि. किशोर वकाटे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, शशांक बदामवार, मिलींद टेकाम, उमेश रोडे, वैभव पत्तीवार स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment