सादिक थैम वरोरा: तेलंगणातील इलंदूर (भद्राचलम) येथून पायी हज यात्रेला निघालेल्या तरुणाचे वरोरा येथे पोहोचताच शेकडो लोकांनी जंगी स्वागत केले. हज यात्रेसाठी 43 वर्षीय तरुण आपल्या घरातून पायी निघाला आहे. इलंदूरपासून हजारो किलोमीटर अंतरावर हज यात्रेला निघालेल्या अब्दुल आबिद वरोरा येथे पोहोचल्यावर त्यांचे शहरवासीयांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
हज यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला.
तेलंगणातील भद्राचलम जिल्ह्यातील इलंदूर गावातील रहिवासी असलेल्या अब्दुल आबिदने देशात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी १२ ऑगस्टपासून हजसाठी पायी तीर्थयात्रा सुरू केली आहे.हा तरुण वरोरा येथे पोहोचताच मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. शनिवारी सकाळी वरोरा येथून हजसाठी त्यांचा प्रवास सुरू आहे. बकरीद दरम्यान मक्का आणि मदिना येथे हज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पायी प्रवास करण्याचा संकल्प केला.
त्यासाठी त्यांनी साडेआठ हजार किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालवण्याचा संकल्प केला आहे. पदयात्रेदरम्यान त्याला वाघा सीमेपर्यंत अनेक लोक त्याला साथ देणार आहे.त्यानंतर तो पाकिस्तानमार्गे एकटाच प्रवास करून इराण, इराक-कुवेत आणि त्यानंतर सौदी अरेबियाला पोहोचेल. ते अंतर कापण्यासाठी त्यांना सुमारे 9 महिने लागतील. मक्का मदिना गाठण्यासाठी हा तरुण दररोज 25 ते 30 किलोमीटरचे अंतर कापतील. वरोरा परिसरात तरुण पायी चालत हज यात्रेला जात असल्याची माहिती मिळताच शकील पटेल (सदर काझी मोहल्ला मस्जिद मरकज वरोरा, इमाम काझी मोहल्ला मस्जिद (मरकज) अब्दुल गफूर भाई, सय्यद मुश्ताक, इक्बाल शेख, समीर शेख, जमील शेख, रेहान शेख, इसाक शेख, निसार शेख, शमीम भाई नागपूर-चंद्रपार महामार्गावर असलेल्या नंदुरी टोलनाक्याजवळ आल्यानंतर त्यांचे स्वागत केले.
0 comments:
Post a Comment