चंद्रपूर:- शहरातील बायपास रोडवरील जुनोना चौक परिसरात आपल्या राहत्या घरात एका महिलेने वेश्या व्यवसाय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत चार पीडित महिलांची सुटका करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसअटक केली आहे.
04 victimized women were released by taking action against the woman who was running prostitution business at home
दि.२६/१०/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक -२०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा. जुनोना चौक, चंद्रपूर हि तिचे राहते घरी महिलाकडुन वेश्याव्यवसाय करीत आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये विशेष पोलीस अधिकारी महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, महिला व पुरूष अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्रं मालु रा. चंद्रपूर, बनावट गि-हाईक, पंचासह छापा टाकुन दलाल महिला आरोपी तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा. जुनोना चौक, चंद्रपूर यांचेवर कायदेशीर कारवाई केली तसेच ०४ पिडीत महिलाची सुटका करून त्यांना स्वधारगृह येथे दाखल करण्यात आले. सरकारतर्फ पोउपनि संतोष निंभोरकर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे गु.र.नं - १.००९/२०२४ २४ कलम ३,४,५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात विशेष पोलीस अधिकारी महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा / चेतन गज्जलवार, पोहवा / नितेश महात्मे, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल गारघाटे, पोअं/प्रमोद कोटनाके, चालक मिलिंद टेकाम, महिला अंमलदार उषा लेडांगे, अर्पणा मानकर, छाया निकोडे, दिपीका सोडणार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
0 comments:
Post a Comment