Ads

वरोरा शहरात पुन्हा एक विनयभंगाची धक्कादायक घटना.

वरोरा सादिक़ थैम:-वरोरा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे. ही घटना मेडिकल स्टोअर मध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत घडली.
Girl molested in medical store.
शहराच्या मध्यभागी आंबेडकर चौकात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्स मध्ये ही घटना दिनांक 23- 10-2024 रात्रौ साडेआठ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार असे कळते, की या मेडिकल स्टोर मध्ये एक तरुणासह एक महिलाही काम करते. या मेडिकल दुकानाला लागूनच स्टोर रूम आहे. या स्टोर रूमला मधून सामान आणण्यासाठी काल या तरुणीला पाठवण्यात आले. तिच्या मागे जाऊन या तरुणाने तिचा विनयभंग केला. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली. बाहेर येऊन तिने या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली.
घटना घडल्याचे कळताच शहरात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून भारतीय न्याय संहिता 74 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरेने हालचाल करत पोलिसांनी आरोपी- रामू छोटू गाडगे. राहणार सुभाष वार्ड ,वरोरा वय 40 वर्ष शहरातील एका बियर बार मधून अटक केली.
पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरकार हे घटनेची चौकशी करीत आहेत.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment